मुंबई : मराठा क्रांती मोर्चादरम्यान वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने उद्धव ठाकरे, 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर लोक न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.


उद्धव ठाकरे, संजत राऊत आणि इतर लोक न्यायालयाकडून समन्स बजावूनही मुद्दाम प्रकरण लांबवण्याच्या हेतूने न्यायालयात हजर राहत नाहीत. अशा परिस्थितीत वॉरंटचा आदेश पारित करणे आवश्यक असल्याचं फिर्यादीच्या वकिलांनी म्हटलं आहे.


VIDEO | हातात हात घालून उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची एन्ट्री | स्पेशल रिपोर्ट | लातूर | एबीपी माझा




मराठा क्रांती मोर्चादरम्यान सामनाचे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चावर उपहासात्मक टीका करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने मोठं वादंग उभं राहिलं होतं. विरोधकांनीही उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अखेर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना माफी मागावी लागली होती.


दत्ता सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे, 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात पुसद न्यायालयात तक्रार दाखल केली होती.


VIDEO | आर्थिक आरक्षण कोर्टात टिकेल, पण मराठा आरक्षण टिकणं कठीण : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत | पुणे | एबीपी माझा



संंबंधित बातम्या

'सामना'तील वादग्रस्त कार्टूननंतर सेना नेत्यांच्या मनात काय खदखदतंय?

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई

सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा

‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र

व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना