यामुळे इतरांचे आमदार फोडणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले की, "भाजपने शिवसेनेत गळ टाकला आहे आणि 17,18,20 आमदार गळाला लागले आहे, असं म्हटलं जात आहे. पण शिवसेनेला तडा जाऊच शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना अभंग आणि मजबूत आहे. ज्यांनी या बातम्या सोडल्या, चलबिचल केली, त्यांचेच आमदार, खासदार आज सोडून जात आहेत. त्यांच्याच पक्षात अस्वस्थता आहे."
आशिष देशमुखांसारखे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा प्रश्न विचारला असता राऊतांनी सांगितलं की, "हो आहेत, महाराष्ट्रील प्रमुख पक्षातील अनेक आमदार, महत्त्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहत आहेत. त्यात अनेक मोठी नावं आहेत, योग्य वेळी तुम्हाला कळेल."
आंबेडकर-ओवेसी युती म्हणजे भाजपची बी टीम
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची युती म्हणजे भाजपची 'बी टीम' आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. वंचित बहुजन आघाडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.