Mantralaya : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवन परिसरात दिवसभरात दोन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास उस्मनाबाद येथील सुभाष उंदरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास मंत्रालयात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अग्निशमदलाचे अधिकारी घटनस्थळी दाखल झाले असून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला इमारतीवरून खाली उतरवण्यात आले आहे.  पण दिवसभरात मंत्रालय परिसरात दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 


मंगळवारी सायंकाळी मंत्रालयाच्या टेरेसवर चढून एका व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फायब ब्रिगेडचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं असून आत्महत्या करणाऱ्यास वाचवण्यात आलं आहे. ही व्यक्ती कोण आहे? कोणत्या मागणीसाठी तो व्यक्ती मंत्रालयाच्या टेरेसवर चढला होता? याबाबत माहिती मिळालेली नाही. आमदार निलेश लंके यांनी मध्यस्थी करत व्यक्तीचं प्राण वाचवले आहेत.


सकाळी पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या बाहेर  उस्मानाबादच्या एका व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रॉकेल अंगावर टाकत त्या तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यात यश आलं, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


उस्मनाबादमधील वाशी तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी  सुभाष उंदरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. तांदूळवाडी गावातील शेतीच्या वादातून विधिमंडळ परिसरात  विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतले. या गावात एबीपी माझाची टिम पोंहचली. देशमूख हे उस्मानाबाद मधील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी गावचे रहिवाशी असून तपंधरावर्षांपूर्वीच गाव सोडले आहे. गावात आज त्यांचे घरही नाही. सुभाष कोळगे त्यांना  महादेव आणि शहाजी असे दोन भाऊ आहेत आई-वडिलांच्या नंतर रितसर जमीन आणि जागेची  वाटणी होऊ नये सुभाष उंदरे आणि त्यांचे दोन भाऊ यांच्यात जमिनीसाठी वाद वाद होता परंतु पोलीस स्टेशन कडे या संदर्भात कोणतीही तक्रार सुभाष यांनी यापूर्वी कधीही केलेले नाही मुंबईत घडलेला हा प्रकार आत्महत्येचा प्रयत्न मीडियात आलेल्या बातम्या वरूनच गावातील लोकांना समजलं आहे.


तांदूळवाडी गावातील शेतीच्या वादातून विधिमंडळ परिसरात  विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत उंदरे यांना जवळच्या जेटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणावरुन विधानभवनात मोठा वाद झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.