मुंबई: मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यानंतर आता मनसेने (MNS) 'नो टू हलाल' (Halal Meat Islamic Practices) ही मोहीम हाती घेतली आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग दहशतवाद्यांना आणि देशविरोधी कारवायांसाठी (anti national activities) वापरला जात असल्याचा आरोप करत मनसेने आता याला विरोध केला आहे. याच संदर्भात मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नुकतंच एक पत्रक काढल आहे. मनसेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
मनसेचा आरोप काय आहे?
इस्लामिक पद्धतीने प्राण्याची कत्तल करण्यासाठी हलाल पद्धत (Halal Meat Islamic Practices) आहे. या पद्धतीमध्ये अत्यंत क्रूरतेनं प्राण्यांची हत्या करण्यात येते. त्याउलट हिंदू, शीख आणि ख्रिस्ती धर्मीय हे झटका पद्धतीने मांस खातात. परंतु कालांतराने मांस व्यवसायामध्ये हलाल मांस आणि त्यांचे विक्रेते खाटीक आणि वाल्मिकी समाज यांना अलिप्त करण्यात आले. त्यांच्याकडून पारंपारिक मासं विक्रीचा व्यवसाय हिरावून घेतला, असा आरोप मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी घेतला आहे.
हलालची मक्तेदारी तोडून काढावी आणि वाल्मिकी समाजाला रोजीरोटी मिळवून द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. मांस व्यवसायासह इतर शाकाहारी उत्पादने जसे चिप्स, बिस्कीट, लिपस्टिक, चॉकलेट, आईस्क्रिम हे जमिया उलेमा ए हिंद या संघटनेकडून बेकायदेशीर केले आहे. या उद्योगाच्या नफ्यातून काही भाग हा थेट दहशतवाद्यांना आणि देशविरोधी कार्यासाठी वापरला जातो असा आरोपही मनसेनं केला. विरोधात मोहीम उभारा असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
त्यामुळे भोंग्यांच्या आंदोलनानंतर आता मनसे एक नवीन भूमिका घेताना पाहायला मिळते. भोंगा प्रकरणी राज्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच प्रकारे हलाल मोहिमेवरून देखील वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. हलाल पद्धतीने मिळवलेला हा सर्व पैसा दहशतवाद्यांना दिला जात असून त्यावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी मनसेनं केली आहे. त्यामुळे मनसे 'नो टू हलाल' ही मोहीम हाती घेणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
- Raj Thackeray Speech : शिवसेना सोडण्याआधी बाळासाहेब काय म्हणाले, राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' प्रसंग
- Raj Thackeray Speech Highlights : राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी, जाणून घ्या भाषणातील प्रमुख मुद्दे