Mantralaya Mumbai : मंत्रायलातून (Mantralaya Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचा (BMC) अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाही, म्हणून एका व्यक्तीने मंत्रालयाच्या इमारतीवरुन खाली उडी मारली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात (Mantralaya Mumbai) जाळी लावण्यात आली होती. या जाळीवर हा व्यक्ती पडला असून पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अरविंद बंगेरा असे उडी मारलेल्या नागरिकाचे नाव असून तो बोरीवलीचा राहिवासी आहे. महापालिकेचे अधिकारी त्रास देतात, म्हणून हे कृत्य केलं असल्याचे बंगेरा यांनी म्हटलय. 


सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात लावण्यात आली जाळी 


मंत्रालयावरुन (Mantralaya Mumbai) उडी मारत अनेकांनी जीवन संपल्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, आजवर मंत्रालयावरुन उडी मारत अनेकांनी जीवन देखील संपवले आहे. त्यामुळे मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे. जेणेकरुन असे प्रकार टाळले जातील. मात्र, जाळी लावल्यानंतरही अनेकांनी तशाच पद्धतीने उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. 


2023 मध्ये जाळीवर उडी मारत आंदोलन


वर्धा येथील धरणग्रस्तांनी ऑगस्ट 2023 मध्ये याच जाळीवर उडी मारत आंदोलन केले होते. यावेळी सहा नागरिकांनी या जाळीवर उडी मारली होती. सरकारने आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप करत या नागरिकांनी उडी घेतली होती. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक नागरिक, आंदोलक मंत्रालय गाठतात. अचानक आंदोलन करण्यास सुरुवात करतात. घोषणाबाजी देखील करताना दिसतात. शिवाय अनेकांनी मंत्रालयात जाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंत्रालयात जाळी मारली होती. शिवाय प्रवेशावर निर्बंध लावले होते. 


मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध 


आत्महत्येची प्रकार वाढल्यामुळे मंत्रालयातील (Mantralaya Mumbai) प्रवेशावर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये 2023 मध्ये सरकारने याबाबतची एक नियमावली जाहीर केली होती. प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी एक वेगळा पास देण्यात येईल. शिवाय मंत्रालयात प्रवेश करताना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगता येणार नाही. बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात नेण्यास मनाई असेल, अशा प्रकारचे नियम राज्य सरकारने तयार केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Electoral Bonds : 2019 मधील निवडणुकीच्या तीन महिन्यात भाजपला निवडणूक रोख्यातून मिळाले 3 हजार 50 कोटी; मुंबई आणि कोलकातामधून सर्वाधिक रोखे