'लंच ब्रेक'च्या नावे चालढकल करणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दणका
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2019 07:17 PM (IST)
लंच टाईम हा एक तासाचा असला, तरी मंत्रालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्ध्या तासाच्या आत जेवण उरकून आपल्या जागेवर परतावं लागणार आहे, असं सरकारने जीआरमधून स्पष्ट केलं आहे
मुंबई : मंत्रालयात दुपारच्या वेळेत गेल्यावर ताटकळत राहावं लागणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मंत्रालयात असलेल्या कामचुकार शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने जोरदार दणका दिला आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी दुपारी 1 ते 2 दरम्यान जेवणासाठी फक्त अर्धाच तासाचा वेळ देण्यात आला आहे, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. आश्चर्य म्हणजे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हा निरोप देण्यासाठी जीआर काढण्याची वेळ सरकारवर आली आहे. एका शाखेतील सर्व कर्मचारी एकाच वेळी जेवायला जाणार नाहीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. लंच टाईम हा एक तासाचा असला, तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्ध्या तासाच्या आत जेवण उरकून आपल्या जागेवर परतावं लागणार आहे. Shalimar Express | शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं, प्रेयसाच्या पतीवर सूड उगवण्यासाठी कृत्य राज्यभरातून कामासाठी आलेल्या नागरिकांना अनेकदा कर्मचारी, अधिकारी जेवायला गेले आहेत, अशी उत्तरं दिली जातात. त्यामुळे विनाकारण त्यांना बराच वेळ ताटकळत राहावं लागतं. अनेकदा त्यांची छोटी कामंही रखडली जातात. त्यामुळे सर्वसामान्यांचा त्रागा होतो. यापुढे लंच ब्रेकमध्ये जेवण तीस मिनिटांत आटपून कर्मचाऱ्यांना पुन्हा आपलं काम करण्यासाठी जागेवर यावं लागेल. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारला जीआरचा आधार घ्यावा लागला, हे विशेष.