मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी एटीएसला मोठं यश मिळालं असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिली आहे. हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसने सोडवलं याचा मला अभिमान आहे. अतिसंवेदनशील असं हे हत्या प्रकरण होतं. ते सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, अशी फेसबुक पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहली आहे.

शिवदीप लांडे यांनी काय म्हटलंय?
अतिसंवेदनशील अशी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आम्ही सोडवलं. मी माझ्या एटीएस पोलीस फोर्सच्या सगळ्या साथीदारांना सलाम करतो. एटीएसचे सगळेच अधिकारी कर्मचारी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस एक करून हे प्रकरण सोडवण्यासाठी मेहनत घेतली. मनसुख हिरण मृत्यू प्रकरण हे माझ्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्वात कठीण प्रकरणांपैकी एक होतं.

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी दोघांना अटक
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी दोन आपोरींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे, तर एका बुकीचा समावेश आहे. अटक केलेल्यामध्ये आरोपींमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याचा समावेश आहे. विनायक शिंदे लखनभैय्या एन्काऊंटर केसमधील आरोपी आहे. कोविड काळात कोर्टाच्या निर्णयानंतर विनायक शिंदेला फर्लोवर बाहेर सोडण्यात आलं होतं. मनसूख हिरण हत्याप्रकरणात विनायक शिंदेचा हात आहे, असा एटीएसचा दावा आहे.

दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या दोघांचा या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती, याचा तपास एटीएस घेत आहे. या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय प्रकरण आहे?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. एनआयए मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी तपास करत आहे. मात्र मनसुख हिरण यांचा चांगल पोहता येत होतं, ते आत्महत्या करु शकत नाही असं त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत होतं.