Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan Live Updates: मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा - हायकोर्ट

Manoj Jarange Patil Azad Maidan Live Updates: आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 01 Sep 2025 03:32 PM

पार्श्वभूमी

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan Live Updates: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे....More

CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा

मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. उद्या 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होते, त्यामुळे न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निर्देश दिले आहेत.