Manoj Jarange Maratha Reservation LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तासातच दरे गावातून मुंबईला रवाना
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या मराठा बांधवांचे पाऊस आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे हाल होत आहेत.
पार्श्वभूमी
Maratha Reservation Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.अश्यात अजून ही आंदोलकांची प्रशासनाने योग्य...More
पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे उद्या (1 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मुलाच्या गाडीवरही हल्ला .. हाके यांच्या वर निरा येथे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी कळताच त्यांचा मुलगाही त्यांना भेटायला निघाला असताना हडपसरच्या पुढे वडकी येथे मुलाच्या गाडीवर हल्ला करून गाडीचे टायर फोडून टाकले आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली
मंत्रिमंडळ उपसमिती आज रात्रीतून प्रस्ताव तयार केला जाणार
प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली जाणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर जरांगेंना शिंदे समिती भेटणार
हैद्राबाद आणि सातारा गॅझेटियर संदर्भातही आज बैठकीत चर्चा
शिंदे समिती पाठोपाठ राज्याचे महाधिवक्ता यांनी मागितला अभ्यासासाठी वेळ
जरांगेंची मागणी आणि न्यायालयाचे मागील निर्णयानुसार सरकारचा खल सुरू
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मुंबईला रवाना झाले आहेत. गणपतीसाठी दरेगावी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तासात मुंबईला रवाना झाले आहेत. मुंबईत महत्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी शिंदे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक
राज्याचे महाधिवक्ता देखील उपसमिती बैठकीला उपस्थित राहणार
ओबीसीतून आरक्षण मागण्याच्या मुद्द्यावर महाधिवक्ता यांच्याकडून उपसमिती घेणार कायदेशीर सल्ला
मराठा बांधवांना ‘सरसकट कुणबी’ संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा नकार
मंत्रीमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच
अशात, ह्या संदर्भात महाअधिवक्त्यांसोबत उपसमिती कायदेशीर सल्लामसलत करणार
बीड : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण सुरु असून त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आंदोलकांना अन्न पाण्याची सोय नसल्याचे समोर आल्यानंतर आता बीडकर पुढे धजावले आहेत. आंदोलकांना निदान दोन वेळचे जेवण मिळावे. यासाठी बीडकरांनी पुढाकार घेतला आहे. बीडच्या गांधनवाडी, पांढरवाडी, सकुंडवाडी, उंडेवाडी, कोतन, खलाटवाडी या गावांतून 30 ते 35 हजार भाकऱ्या, चटणी, ठेचा आणि लोणच्याची शिदोरी मुंबईला रवाना करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे या आझाद मैदानावरून निघत असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार घडला. यावेळी सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. यावेळी मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी देखील गेल्याच्या पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाल्या आहेत. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
छगन भुजबळांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईत तातडीची बैठक बोलावली
उद्या ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर ओबीसी नेत्यांची भव्य पत्रकार परिषद
मनोज जरांगे यांनी आग्रह धरलेल्या हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेट बाबतचे हाय कोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्देश पत्रकार परिषदेत मांडणार असल्याची सूत्रांची माहिती
मराठा बांधवांना ‘सरसकट कुणबी’ संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार
मंत्रीमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच
दोन्ही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वात मोठे अडसर
अशात, महाअधिवक्त्यांना ह्या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता बैठक
दरम्यान, सरसकट कुणबी उल्लेख करता येणार नसल्याने कोर्टाचा अडसर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा खासदार उज्वल निकम यांच्या निवासस्थानी दाखल
गणपती बाप्पाच्या दर्शनाला जे पी नड्डा जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आशिष शेलार देखील सोबत
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली
संध्याकाळी पाच वाजता पुन्हा एकदा बोलवण्यात आली बैठक
राज्याचे महाधिवक्ता देखील उपसमिती बैठकीला उपस्थित राहणार
ओबीसीतून आरक्षण मागण्याच्या मुद्द्यावर महाधिवक्ता यांच्याकडून उपसमिती घेणार कायदेशीर सल्ला
पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड परिसरामध्ये भरधाव वेगात आलेल्या डंपरने एका दुचाकी स्वाराला चिरडले आहे, या दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे , या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.दीपक बहादूर साई असं या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या 32 वर्षीय दुचाकी स्वाराचे नाव आहे, तो देहूरोड परिसरामध्ये एका सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो, सकाळी दुचाकीवरून कामावर जात असताना, मागून आलेल्या डंपरणे त्याला उडवलं यात तो मृत पावला आहे. ही घटना आज सकाळी 9.30 वाजता घडली होती, या प्रकरणात देहूरोड पोलिसांनी डंपरचा चालक प्रदीप मयूर यादव याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा अशा प्रकारे वाहने चालवल्यात येत असल्यामुळे शहरात या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करत आहे राज्यभरातील हजारो मराठा बांधव देखील मुंबईत ठाण मांडून आहेत. मराठाबांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्याने नाशिकमधून विविध गाव खेड्यातून मराठा बांधवांकडून पाच ते सात हजार चपाती- भाकरी, लोणचे, ठेचा तसेच पाणी बाटली आणि बिस्कीट, फरसाणचे पुडे घेऊन पाच ते सात गाड्यांमध्ये घेऊन मुंबईच्या दिशेला बना झाले आहेत. नाशिक मधून काही मराठा बांधव मुंबईत दोन दिवस आंदोलनात सहभागी झाले होते मात्र सोबत असलेल्या मराठा बांधवांची गैरसोय बघून पुन्हा ते नाशिक मध्ये येऊन मोठी रसत घेऊन पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सरकारी कडून कोणतीही व्यवस्था होत नसल्याने पुढे कितीही दिवस आंदोलन सुरू राहिले तरी देखील आम्ही आमच्या बांधवांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था जबाबदाऱ्यांनी करू असे मत व्यक्त केले आहे
मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान, राज्य सरकारने यात लक्ष घालण्याची मुंबईतील व्यापाऱ्यांची मागणी
आझाद मैदानावर मराठा मोर्चा मुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे खोळंबळी आहे आणि त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबईतील व्यापाऱ्यांना व्यवसायिकांना बसत असल्याचं व्यापारी संघटनांचे म्हणणं आहे
शनिवार रविवार सुट्टीच्या काळात हे आंदोलन सुरू असल्याने त्याचा मोठा फटका दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्याना बसला असून मोठं नुकसान यामुळे व्यापाऱ्याचा होत आहे, असं व्यापारी संघटनांचे म्हणणं आहे
त्यामुळे राज्य सरकारने किंवा उच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून तातडीने तोडगा सोडवण्याची मागणी व्यापारी संघटना कडून करण्यात आली आहे
शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार
उरळी कांचन येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर शरद पवार पुण्यातील निवासस्थानी जातील
दुपारी साधारण ३ वाजता शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना होणार
संध्याकाळच्या सत्रात शरद पवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का हे पाहणे महत्त्वाचे
मनोज जरांगे यांच्याशी आज शरद पवार संवाद साधण्याची शक्यता
मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीसाठी मंत्री दाखल होण्यास सुरुवात
मंत्री दादा भुसे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सचिव गणेश पाटील दाखल
सोबतच, कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी देखील बैठकीसाठी पोहोचले
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेला आणि ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखला जाणारा सौताडा येथील रामेश्वर धबधबा सततच्या दमदार पावसाने प्रवाहित झालाय. सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विंचरणा तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून वाहू लागला असून, त्याचा पुरेसा विसर्ग होताच धबधबा दिमाखदार ताकदीने कोसळू लागला आहे.
गत दोन वर्षांच्या काळानंतर धबधबा यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले असून, धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची गर्दी होत आहे. निसर्गाच्या या अद्भुत लीलेला डोळ्यांनी टिपण्यासाठी अनेकजण मोबाईल आणि कॅमेऱ्यात क्षण कैद करत आहेत.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. धबधब्याच्या वरील भागात पर्यटकांनी जाऊ नये, सुरक्षित अंतरावरूनच आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या मांडुन बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचुन हाल होऊ नयेत यासाठी थेट कळंब हुन मुंबईला खाद्यसामग्री रसद पुरवली जात आहे.घरोघरी थाटलेल्या भाकरी कांदा चटणी बिस्कीटे ते अगदी औषधी इत्यादी साहीत्य घेवुन राञी तीन मालवाहु वाहने मुंबईकडे रवाना झाली आहे.मुंबईतील आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने बांधव दाखल झाले असुन त्यांच्या खाण्या पिण्याचे हाल होत असल्याने कळंब शहर व तालुक्यातुन मोठ्या संख्येने मदतीसाठी हात सरसावले एक घर दोन भाकरी असा सोशल मिडीयावर मॅसेज फिरला अन् नागरीकांनी भरभरून देत तिन वाहने मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. मुस्लिम बांधवांनी ही मराठा समाजाच्या लढ्याला आपला मदतीचा हात दिला आहे.
मुंबईतील मराठा बांधवांसाठी कळंब हुन एक क्विंटल शेंगा चटणी व 20 हजार भाकरीची शिदोरी
व्हाट्सअपवर एक मेसेज आणि गाव खेड्यातून जमा झाली शिदोरी
मराठा आरक्षण लढाईला मुस्लिम बांधवांकडूनही मदत
Anc:मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या मांडुन बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचुन हाल होऊ नयेत यासाठी थेट कळंब हुन मुंबईला खाद्यसामग्री रसद पुरवली जात आहे.घरोघरी थाटलेल्या भाकरी कांदा चटणी बिस्कीटे ते अगदी औषधी इत्यादी साहीत्य घेवुन राञी तीन मालवाहु वाहने मुंबईकडे रवाना झाली आहे.मुंबईतील आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने बांधव दाखल झाले असुन त्यांच्या खाण्या पिण्याचे हाल होत असल्याने कळंब शहर व तालुक्यातुन मोठ्या संख्येने मदतीसाठी हात सरसावले एक घर दोन भाकरी असा सोशल मिडीयावर मॅसेज फिरला अन् नागरीकांनी भरभरून देत तिन वाहने मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. मुस्लिम बांधवांनी ही मराठा समाजाच्या लढ्याला आपला मदतीचा हात दिला आहे.
गणेशोत्सवात शहर व जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे
पुणे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार आज पासून म्हणजे गौरी आगमन ते २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) या दिवशी विक्री बंद राहील
विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मिरवणूक संपेपर्यंत दुकाने बंद ठेवावी लागतील
याआधी दहा दिवस मद्यविक्री बंदीचा आदेश होता; मात्र उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती
कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली हे सुधारित आदेश काढले आहेत
मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबईत वाशी, वाडी बंदर, शिवडी, माझगाव डॉक अशा विविध ठिकाणी थांबवले आहे, तिथे राहून रोज सकाळी हे आंदोलक मुंबई लोकलने सीएसएमटी स्थानकात येतात तिथून आझाद मैदानात जातात, मात्र प्रवासात देखील ते एक मराठा लाख मराठा या घोषणा देत येत आहेत, मुंबई लोकल मध्ये ही मराठ्यांचा आवाज ऐकू येतोय, ग्रॅजुएट असून, उच्च शिक्षण घेतले असून आज शेती करावी लागत आहे, कारण आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही, यामुळे मुंबईत आंदोलन करत आहे असे या आंदोलकांनी सांगितले आहे.
सकाळी 11 वाजता : भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी यांचे गणेश दर्शन, वर्षा निवासस्थान, मुंबई
दुपारी 1.20 वाजता : लालबागचा राजा गणेश दर्शन, परेल, मुंबई
दुपारी 2.20 वाजता : श्री स्वामीनारायण मंदिर दर्शन, बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, दादर रेल्वेस्थानकासमोर, दादर, मुंबई
दुपारी 3 वाजता : गणेश दर्शन, डब्ल्यू 54 को.ऑप. हाऊसिंग सोसायटी, माटुंगा, मुंबई
दुपारी 3.30 वाजता : गणेश दर्शन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बांद्रा पश्चिम, मुंबई
दुपारी 4.30 वाजता : भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांना, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची माहिती -
(दिनांक ३१ ऑगस्ट २०२५)
१) पाणी टँकर्स -
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण २५ टँकर उपलब्ध करून दिले आहेत.
आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे येलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहन तळ, वाशी जकात नका या ठिकाणी सदर टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
२) स्वच्छता -
आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात मिळून महानगरपालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून अखंडपणे स्वच्छता राखली जात आहे.
आंदोलकांना देखील महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी थैल्या (डस्टबिन बॅग) मोठ्या संख्येने वितरित करण्यात येत आहेत. या थैल्यांमध्ये आंदोलकांनी कचरा टाकून तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावा, यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.
३) प्रसाधनगृह -
आझाद मैदान आणि परिसरात, नियमित आणि फिरते असे मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक शौचकूप असणारी प्रसाधनगृहांची व्यवस्था आंदोलकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. प्रसाधनगृहांमध्ये देखील नियमितपणे स्वच्छता केली जात आहे.
मंत्रीमंडळ उपसमितीची आज पुन्हा बैठक
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली बैठक
आज सकाळी ११ वाजता रॉयलस्टॉन निवासस्थानी होणार खलबते
मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी होणार चर्चा
गैरसोईमुळे काल रोष व्यक्त केल्यानंतर पालिका प्रशासनाने आता मराठा बांधवांसाठी म केले आहे. आंदोलनाच्या तिसर्या दिवशीही मराठा बांधवांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. आज सकाळी मराठा बांधवासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून जेवणाच्या गाड्या पाठवल्या आहेत.
आमचा संयम सुटल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू
नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने सुविधा पुरविल्या नाहीत
रहायला जागा दिली असली तरी या ठिकाणचे शौचालय सगळे बंद आहेत .
पाणी उपलब्ध करून दिले जात नाही
आंघोळी करता येत नाही.. श्रीमंत असलेली महानगरपालिका पाणी का देत नाही .. संतप्त आंदोलकांचा सवाल
आंदोलनाचा दुसरा दिवस संपताच मराठा आंदोलक परत एकदा नवी मुंबईत दाखल
वाशीतील सिडको एग्जिबिशन सेंटर मध्ये मराठा आंदोलक राहण्यासाठी आले
अनेक ठिकाणी जेवणाची लगबग सुरू
वेगवेगळे ग्रुप आप आपले जेवण बनवत आहेत
प्रश्स्त अशा सिडको हॅाल मध्ये रात्रीचा मुक्काम करून सकाळी परत आंदोलक मुंबईकडे निघणार
मराठा आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. काल गैरसोईमुळे आंदोलक रस्त्यावर उतरल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी CSMT परिसरात झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी CSMT परिसरात LED स्क्रीन लावली आहे. ज्याने करून बाहेर मराठा बांधवांची गैरसोय झाल्यास थेट जरांगे पाटील मराठा बांधवाना सूचना देतील. तर काही गैरप्रकार घडत असेल तर स्वत: जरांगे पाटील हेही सूचना करतील.
आमचा संयम सुटल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू...
नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने सुविधा पुरविल्या नाहीत.
रहायला जागा दिली असली तरी या ठिकाणचे शौचालय सगळे बंद आहेत. पाणी उपलब्ध करून दिले जात नाही.
आंघोळी करता येत नाही.. श्रीमंत असलेली महानगरपालिका पाणी का देत नाही.. संतप्त आंदोलकांचा सवाल...
मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आता आम्ही पसरले आहोत.
फक्त मनोज दादाने आदेश द्यावा आम्ही पूर्ण मुंबईत एका तासात बंद करून दाखवू,
दीड लाख गाड्या आता मुंबईत आहेत, त्यामुळे सरकारने विचार करावा,
मुंबईकर आम्हाला खूप सहकार्य करत आहेत पण सरकार करत नाही.
हाल होत असल्याचे चित्र समोर येत होते, मात्र आता या बाहेरून आलेल्या आंदोलकांसाठी मुंबईकर सरसावले आहेत, स्थानिक मराठा बांधव स्वतःहून नाश्ता, जेवण बनवून या मराठा आंदोलकांना देत आहेत, अनेक ठिकाणी बॅनर लावून, सोशल मीडियावर संदेश पाठवून एक भाकरी, ठेचा, वरण भात घेऊन येण्याचे आवाहन करण्यात येत आहे, मानखुर्द येथे असेच चित्र दिसून येत आहे, स्थानिकांनी चहा आणि पोहे बनवले आहे आणि मराठा आंदोलकांना देत आहेत.
जेवणाच्या गाड्या मुंबईत सोडत नसल्याने जतचे माजी आमदार विक्रम सावंत आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी... अटल सेतूवर घडला प्रकार... जेवणाच्या गाड्या सोडल्यानंतर वाद निवळला
मुंबईत आंदोलकाच्यासाठी जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या पोलीस अधिकाऱ्याने अडवल्याने जतचे माजी आमदार विक्रम सावंत आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडलाय.
अटल सेतूवर हा प्रकार घडला असून या वादावादीचा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडीओत मुंबईत मराठा आंदोलकाना जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या का अडवत आहात असा सवाल विक्रम सावंत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला करत आहेत. यावेळी दोघांमध्ये प्रचंड वादावादी देखील झाल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांने जेवण घेऊन जाणाऱ्या सोडल्याने हा वाद मिटला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकासाठी राज्यभरातून जेवण पोचवले जात आहे
बीड प्रकरणातील रंजीत कासले मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला...
आझाद मैदानात घेणार मनोज जरांगे यांची भेट..
सध्या पोलीस सेवेतून बडतर्फ असल्याने रंजीत कासले मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी
शरद पवार हे आज आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता
मराठ्यांच मुंबईत आंदोलन नवी मुंबईत मुक्काम दिनक्रम सुरू. आजचा तिसरा दिवस. रात्री नवी मुंबईत आराम केल्या नंतर सकाळी उठून भाकरी , चटणी , ठेचा खावून आंदोलक परत एकदा मुंबईकडे निघणार
मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे, अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या टँकर, कंटेनर सारख्या गाड्या मुंबईच्या बाहेर थांबवल्या जात आहेत. यात थ्री एक्सेल, फोर एक्सेल, फाइव एक्सेल गाड्यांचा समावेश आहे, मात्र यामुळे काही माल वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान देखील होत आहे, नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या, भारताबाहेर एक्सपोर्ट करणाऱ्या गाड्या देखील थांबवल्या गेल्याने याचा फटका त्या वाहनचालकांना बसतोय.
प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे सोईसुविधा पुरविल्या जात नसल्याचं आझाद मैदानावर मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांनी सांगितलं... आंघोळीसाठी पाणी नाही शौचालय नाहीय जेवणासाठी फूड स्टॉल्स नाहीत अशी तक्रार सुद्धा त्यांनी केली
त्यानंतर मुंबई महापालिकेने आपण सगळ्या प्रकारची तयारी आणि सोयी पुरवल्या असल्याचं स्पष्टीकरण दिले. मुंबई महापालिकेने फॅशन स्ट्रीट रोडवर अडीशेच्या जवळपास पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था या आंदोलकांसाठी केली आहे. याशिवाय आंघोळीसाठी टँकर सुद्धा मागवले आहेत
मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे, मुंबईत येणारी मराठा आंदोलकांच्या गाड्या इथे थांबवण्यात येत आहेत. त्या गाडीत असलेल्या आंदोलकांची चौकशी करून मुंबईत प्रवेश दिला जातोय, ज्या गाड्यांमध्ये खाण्याचे साहित्य आहे त्यांची नोंद केली जात आहे तर या गाड्या कुठे पार्क करायच्या याची माहिती मुंबई पोलीसंकडून आंदोलकांना दिली जात आहे, सायन पनवेल हायवे वरील मानखुर्द परिसरात नाकाबंदी
आझाद मैदान आणि आसपास परिसरात राहणाऱ्या आंदोलकणा खाण्याची व्यवस्था राज्यभरातील मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. सकाळचा नाश्ता वाटप सध्या महानगरपालिके समोर सुरू आहे. केळी, सफरचंदे वाटप होत आहे. अनेक टेम्पो सध्या नाश्ता वाटप करताना दिसत आहेत.
मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास वर्षा या निवासस्थानी त्यांनी चर्चा केली
मराठा उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला
काल मराठा उपसमितीची शिंदे समिती सोबत बराच वेळ चर्चा झाली होती त्याशिवाय उपसमितीच्या सुद्धा दोन बैठका झाल्या
जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहता सरकार यातून कोणता मार्ग काढणार? हे पहावे लागेल
आज सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा उप समितीची बैठक बोलवण्यात आली आहे ज्यामध्ये सखोल चर्चा केली जाणार आहे....
मनोज जरांगे पाटील हे कालपासून स्टेजवर झोपून आहेत. शनिवारी रात्रीही ते झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही आंदोलक रस्त्यावर बसून आहेत पालिकेच्यावतीने अंघोळ करण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवण्यात आला आहे. परंतु केवळ एक टँकर आल्याने गैरसोय होते असल्याची आंदोलकच म्हणणं आहे. तसेच नैसर्गिक विधीसाठी पाणी नाही, अशी देखील आंदोलकांची तक्रार आहे.
नवी मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक रहायला आल्याने त्यांना मुंबईत जाण्यासाठी ट्रेन बरोबर बस उपलब्ध करून द्या. नवी मुंबई परिवहन , बेस्ट , एस टी गाड्या सोडण्याची विनंती. वाशीतून आझाद मैदान पर्यंत बस सोडा. आंदोलकांना जेवण पुरविण्यासाठी शहरातील रहिवाशांना चटणी - भाकरी देण्याचे आवाहन मराठा समन्वयक विनोद पोखरकर यांनी केले आहे.
सातारा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी झाले दाखल...
शिवसागर जलाशयात ताराफ्यातून पलीकडे गाड्या दरे गावात झाल्या दाखल...
दरेगावी निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा परिवार दरे गावात मुक्कामी
एकनाथ शिंदे यांचा दरेगावात दोन दिवसाचा मुक्काम
पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची अडवणूक केली जात आहे. पोलिसांकडून त्यांच्या गाड्या रोखल्या जात आहेत, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला
शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर विखे पाटील आणि गिरीश महाजन गेले होते. एक तास चर्चा करुन हे दोन्ही नेते बाहेर पडले. या बैठकीत काय चर्चा झाली, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
30 ऑगस्ट शनिवारी रोजी अजमेर शरीफ दर्ग्यात ख्वाजा मोइनोद्दीन चिशती यांची छट्टी शरीफ होती. त्यावेळी मुंबईतील मुस्लिम युवक अझीम तांबोळी यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी नवस केला आणि प्रार्थनाही केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.अश्यात अजून ही आंदोलकांची प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्याने सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.
मुंबईत मराठा आरक्षणासाठी हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणाचा तिसरा दिवस असून या आंदोलनाची दुसरी रात्र आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये काढली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Manoj Jarange Maratha Reservation LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तासातच दरे गावातून मुंबईला रवाना