Manoj Jarange Patil all demands about maratha reservation and government response : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आज (दि.2) तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याकडे पोहोचलं. यावेळी मनोज जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्या निर्णयांचा जीआर द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या मागण्या केल्या होत्या? आणि सरकारने त्यांना कोणतं उत्तर दिलं? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि सरकारची उत्तरं, स्टेप बाय स्टेप सर्व माहिती!
Manoj Jarange Patil all demands about maratha reservation and government response : मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारचं उत्तर काय? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Manoj Jarange Patil all demands about maratha reservation and government response
- 1) हैदराबाद गॅझेटियर लागू करा लागू करावे.
सरकारचं उत्तर - हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे. तात्काळ लागू करणार. जीआर काढणार (सर्व अपडेट ABP Majha वर)
- 2) सातारा संस्थान जीआर काढा -
सरकारचं उत्तर -औंध आणि सातारा गॅझेटमध्ये काही त्रुटी आहेत. १५ दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल. जीआर काढणार
(सर्व अपडेट ABP Majha वर)
- 3) मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
सरकारचं उत्तर - सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेणार, शासन निर्णय जारी करणार. मराठा आरक्षण आंदोलनमध्ये बळी गेलेल्या कुटुंबियांना 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन मंडळात नोकरी मिळेल. जर शिक्षण मुलाचा जास्त आले तर सरकारी नोकरीं द्यावी (सर्व अपडेट ABP Majha वर)
- 4) आम्हाला कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
सरकारचं उत्तर - मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला. (सर्व अपडेट ABP Majha वर)
- 5) 58 लाख कुणबीच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये नोंद करा
उत्तर - जेवढे दाखले आले ते तातडीने द्या असा निर्णय आम्ही घेऊ. आता मनुष्यबळ त्याला दिलं आहे जलदगतीने काम होईल. (सर्व अपडेट ABP Majha वर)
- 6) मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे
सरकारचं उत्तर - किचकट आहे त्याला वेळ लागेल 1 महिना लागेल. (सर्व अपडेट ABP Majha वर)
- 7) सगेसोयरेचा निर्णय घ्या
उत्तर - याला वेळ लागेल ८ लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे.
(सर्व अपडेट ABP Majha वर)
- 8) ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या. सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या.
सरकारचं उत्तर - गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार .
(ताज्या बातम्या ABP Majha वर)