Manoj Jarange Patil In Mumbai मुंबई: मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (29 ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. मानखुर्द, चेंबूरमध्ये मनोज जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल (Manoj Jarange Mumbai Morcha) झालेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे आझाद मैदानही हाऊसफुल्ल झालंय. मनोज जरांगेंनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा...13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

Continues below advertisement

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

सरकारची भूमिका काय?

1. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही2. ओबीसींमध्ये आधीच 350 जाती झाल्यात3. मराठ्यांना स्वतंत्र 10 टक्क्यांचे आरक्षण दिलेय4. मेडिकलला ईसीबीसीचं कट ऑफ ओबीसींपेक्षा कमी5. अभ्यास करुन मराठा आरक्षणाची मागणी करावी

मनोज जरांगेंना आंदोलनासाठी एका वेळी एकाच दिवसाची परवानगी-

आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय. आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे. 

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकला; आझाद मैदान गच्च, गर्दी किती?, पाहा PHOTO