मुंबई : दादरमधील कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांच्या हातून निसटला आहे. 900 कोटी रुपयांचे कर्ज फेडले नसल्यामुळे उन्मेश जोशी यांनी हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट गमावला आहे. दादरमधील एका आर्किटेक कंपनीने कोहिनूर स्क्वेअऱचे काम हाती घेतले असून येत्या 15 ते 18 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


उन्मेश जोशी यांनी प्रभादेवी येथील शिवसेना भवनासमोर कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट सुरु केला. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. उन्मेश जोशी यांनी 900 कोटी रुपयांचे कर्ज थकवले. त्यामुळे संबधित बॅंकानी नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनलकडे दाद मागितली. ट्रिबुनलने याप्रकरणी निकाल दिल्यानंतर जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागला आहे.

हा प्रोजेक्ट आता संदीप शिक्रे आणि असोसिएट्स या आर्किटेक कंपनीला मिळाला आहे. ही कंपनी येत्या 15 ते 18 महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करेल.

वाचा : बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही : आमिर खान

       रेल्वेमध्ये बिल मिळालं नाही तर जेवण फुकट