भिवंडीतील दापोडात केमिकल गोदामाला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2018 04:12 PM (IST)
गोदामात हायड्रोजन पेरॉक्साईडसह इतर केमिकल्सचा साठा असल्याचे सांगितलं जात आहे.
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरात एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे. पारसनाथ कॉम्प्लेक्समध्ये हे गोदाम आहे. आज सकाळच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे दापोडा परिसरातील या गोदामातून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट येत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडथळा येत आहे. वेदांत ग्लोबल वेअर हाऊस असं गोदामाचे नाव असून गोदामात हायड्रोजन पेरॉक्साईडसह इतर केमिकल्सचा साठा असल्याचे सांगितलं जात आहे.