Mumbai Rains LIVE UPDATE | मुंबई : किंग सर्कल स्टेशनखाली सायन-माटुंगा पोलीस स्थानबाहेर हायवेवर अजूनही कमरेपर्यंत पाणी

मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2020 04:55 PM
मुंबई : सात रास्ता परिसरात दीड फूट पाणी, पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक कोंडी, सर्वच रस्त्यावर पाणी आल्याने वाहांचालकांची तारांबळ
किंग सर्कल स्टेशनखाली सायन-माटुंगा पोलीस स्थानबाहेर हायवेवर अजूनही कमरेपर्यंत पाणी. संध्याकाळच्यावेळी घरी परतणा-या चाकरमान्यांचे हाल. बंद पडलेल्या बस आणि ट्रक खेचण्याचं काम बेस्ट प्रशासन आणि मुंबई ट्राफिक पोलिसांकडनं सुरू.

मुसळधार पावसाने पश्चिम रेल्वे पुन्हा ठप्प, रेल्वे रुळावर पाणी वाढल्याने सर्व मार्गिका बंद
मुसळधार पावसाने पश्चिम रेल्वे पुन्हा ठप्प, रेल्वे रुळावर पाणी वाढल्याने सर्व मार्गिका बंद
पश्चिम रेल्वे हळू हळू सेवा पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात, जलद मार्गावरील दोन्ही दिशेने पहिली लोकल रवाना, चर्चगेट वरून विरारच्या दिशेने आणि अंधेरी वरून चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गावरून लोकल सोडल्या, धीमा मार्ग अजूनही ठप्प
रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मनमाड-मुंबई विशेष आणि मुंबई-मनमाड विशेष ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर एलटीटी-गुवाहाटी विशेष ट्रेन दुपारी 1 वाजता, सीएसएमटी-केएसआर बंगळुरु विशेष ट्रेन दुपारी 12.30 वाजता आणि सीएसएमटी-लखनौ विशेष ट्रेन दुपारी 12.40 वाजता सुटणार आहे.
पावसामुळे पाणी साचल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून तर मर्यादित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. मुंबई-भुवनेश्वर विशेष ट्रेन रात्री दहा वाजता सुटेल. तर मुंबईच्या दिशेने येणारी भुवनेश्वर-मुंबई विशेष ट्रेन ठाण्यापर्यंत धावेल. हावरा-मुंबई विशेष ट्रेनही ठाण्यापर्यंत धावणार आहे. याशिवाय हैदराबाद-मुंबई विशेष ट्रेन कल्याण तर गडग-मुंबई ट्रेनचा शेवटचा थांबा कल्याण स्थानकात असेल.

दक्षिण मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं असताना मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनलाही फटका बसला आहे. आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये पावसाचं पाणी शिरलं.
मुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पाणी शिरलं आहे. वैद्यकीय साहित्य पाण्यात, रात्रीपासून डॉक्टर आणि कर्मचारी साहित्य सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यात व्यस्त
सततच्या पावसामुळे आणि सायन-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला आणि मस्जिद बंदर स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतून सीएसएमटी-ठाणे, सीएसएमटी-वाशी दरम्यानची सेवा रद्द करण्यात आली आहे. तर ठाणे-कल्याण आणि त्यापुढील तसंच वाशी-पनवेल शटल सेवा सुरु आहे. लांब पल्ल्याच्या विशेष गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयं, आस्थापनं बंद ठेवण्याचं तसंच नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
मुंबईप्रमाणेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवर होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कारण मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. सायन रेल्वे स्थानकांतील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. अशाच प्रकारे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर देखील पाणी भरले आहे. सध्या लोकडाऊनमुळे सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसला तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र लोकल सुरू आहेत. मात्र मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसण्याची शक्यता आहे.
प्रचंड पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.
मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं असल्यामुळे बेस्ट बसची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरात 122.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबई शहरासह उपनरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. तसेच येत्या 24 तासांतही मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर वरळीच्या बीएमसी क्वॉर्टसमध्ये पाणी शिरलं.

मुंबईमध्ये काल सध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवर होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कारण मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. सायन रेल्वे स्थानकांतील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. अशाच प्रकारे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर देखील पाणी भरले आहे. सध्या लोकडाऊनमुळे सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसला तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र लोकल सुरू आहेत. मात्र मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसण्याची शक्यता आहे.

प्रचंड पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं असल्यामुळे बेस्ट बसची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरात 122.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.