Shinde Government GR : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवं सरकार अस्तित्त्वात आलं. शिंदे सरकार सत्तेवर येऊन महिना लोटला आहे. मात्र अद्याप ही मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळालेला नाही. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचे राज्यभर जोरदार दौरे सुरु आहेत. सर्वसामान्य लोकांची काम होत नाहीत, असा आरोप होत असताना शिंदे सरकारने निर्णयांचा मात्र मोठ्या प्रमाणावर धडाका सुरु केला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांना ठाकरे सरकारने स्थगिती दिल्यानंतर आता शिंदे सरकार सत्तेवर येताच ते निर्णय नव्याने घेण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ अस्तित्वात नसतानाही एका महिन्यात तब्बल 749 शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत.
या शासन निर्णयात सर्वाधिक आरोग्य विभागाचे तब्बल 91 तर पर्यावरण विभागाचे सर्वात कमी 2 शासन निर्णय निघाले आहेत. 12 जुलै रोजी सर्वाधिक 70 शासन निर्णय निघाले असून त्यात 36 शासन निर्णय हे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे आहेत. शिंदे गटात दाखल झालेले गुलाबराव पाटील हे या विभागाचे माजी मंत्री आहेत.
कोणत्या विभागाचे किती शासन निर्णय निघाले त्यावर एक नजर...
- सार्वजनिक आरोग्य विभागात 21 दिवसात 91 शासन निर्णय
- सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात 13 दिवसांत 83 शासन निर्णय
- सामान्य प्रशासन विभागात 19 दिवसात 63 शासन निर्णय
- शालेय शिक्षण व क्रीडा विभागात 16 दिवसात 50 शासन निर्णय
- महसुली व वन विभागात 16 दिवसात 44 शासन निर्णय
- जलसंपदा विभागात 13 दिवसात 41 शासन निर्णय
- कृषी विभागात 18 दिवसात 35 शासन निर्णय
- तर सर्वात कमी मराठी भाषा विभागाचे 3 दिवसात 3 शासन निर्णय
- पर्यावरण विभागाचे एका दिवसात फक्त 2 शासन निर्णय काढण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या