Sharad Pawar On Patra Chawl Scam: सध्या चर्चेत असलेल्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने हे आव्हान स्वीकारले आहे. शरद पवार यांनी चौकशीची तयारी दर्शवली असून सत्य बाहेर येईल असे म्हटले. भाजप सरकर काळात देशातील नागरिकांसमोरील प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका पवार यांनी केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात अटक केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून भाजपने शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवार यांनी 14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. या प्रकरणी चौकशी करावी. त्याला आमचा विरोध नाही. पण, भाजपकडून पराचा कावळा करण्यात येत आहे असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
भाजपचे आरोप काय?
मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी