Mumbai Local :  मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवारी दिवा स्थानकामध्ये विविध तांत्रिक कामं करण्यासाठी 12 तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे या रविवारी ठाणे (Thane) ते कल्याण (Kalyan) स्थानकादरम्यान अप आणि डाऊन फास्ट अशा दोन्ही मार्गिकांवर सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. 


मेगा ब्लॉकच्या दिवशी सीएसएमटी (CSMT) स्थानकातून सुटणार्‍या फास्ट लोकल सकाळी 7.55 ते रात्री 7.50 या वेळेत मुलुंड आणि ठाणे, कल्याण स्टेशन मध्ये डाऊन स्लो ट्रॅकवर चालवल्या जाणार आहेत. तर कल्याण मधून सुटणार्‍या अप फास्ट लोकल सकाळी 8.36 ते रात्री 7.50 या वेळेमध्ये कल्याण ते मुलुंड स्थानकादरम्यान अप स्लो ट्रॅकवर वळवल्या जाणार आहे. त्यामुळे काही लोकल 10-15 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.


अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनाकडून दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे. उद्या असणाऱ्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलंय. रेल्वे प्रशासनाकडून विविध देखभालीची काम करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. तर हार्बर आणि वेस्टर्न लाईनवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha