मुंबई :  राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी   भारतातील  सर्वात मोठ्या धारावीतील कम्युनिटी टॉयलेटचे उद्घाटन केले आहे. या कम्युनिटी टॉयलेटचा फायदा जवपास 50 हजार नागरिकांना होणार आहे. या कम्युनिटी टॉयलेटमध्ये अंघोळीची सुविधा, वॉशिंग मशिन सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सोयी उपलब्ध असणार आहे.


आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आज धारावीत सुविधा केंद्राचे उद्धटान केले आहे. यामध्ये 800 शौचालयाची सोय करण्यात आली आहे. हे देशातील  सर्वात मोठे कम्युनिटी टॉयलेट आहे. आम्ही नागरिकांना चांगल्या सुविधा, शुद्ध स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच आपल्या देशातील या सर्वात मोठ्या केंद्रासाठी मुंबई महानगरपालिकेला ज्यांनी सहकार्य केले  त्यांचे आभार मानतो! आम्ही घाटकोपर, धारावी, चेंबूर, वांद्रे, सांताक्रूझ आणि गोवंडी येथील आणखी 10 ठिकाणी अशीच सुविधा केंद्रे सुरू करणार आहोत.






 


आदित्य ठाकरे म्हणाले, येत्या काळात आम्ही अशीच सुविधा केंद्र घाटकोपर, धारावी, चेंबूर, वांद्रे, सांताक्रुझ आणि गोवंडी येथे सुरू करणार आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत 19 कम्युनिटी टॉयलेच गेल्या दोन वर्षात धारावी येथे बांधली असून यामध्ये 800 टॉयलेट सीट आहेत.  शाश्वत विकासाला हे केंद्र प्राधान्य देत असून दरवर्षी 6.5 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याची बचत होणार आहे. तसेच, येथे सांडपाणी प्रक्रिया सुविधा व ऊर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनेलचा वापर केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha