मुंबई :  ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेने उडी घेतली आहे. मुंबईत स्वायत्त संस्थांच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंयमात्र स्वायत्त शिक्षण संस्था पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर ठाम आहे. यासंदर्भात महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली आता या मागणी संदर्भातील आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठींबा देऊन ऑनलाईन परीक्षा या महाविद्यालयाने घ्याव्यात अशी मागणी केली आहे. 


शाळा कॉलेज ऑफलाईन सुरु झाले आहेत. शाळांच्या, बोर्डाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील स्वायत्त शिक्षण संस्था, कॉलेजने परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलं आणि याच विरोधात परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घ्या ! या मागणीसाठी विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनात आज उतरले.  मुंबई विद्यापीठ व त्या अंतर्गत येणारे महाविद्यालय जर पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेत असतील तर मग स्वायत्त शिक्षण संस्था ऑफलाईन घेण्याचा आग्रह का करताय ? हा भेदभाव का केला जातोय ?  असा प्रश्नही विद्यार्थी विचारत आहेत. 


काय आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे?



  • पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारे कॉलेज ऑनलाईन घेत आहेत.  म्हणून स्वायत्त शिक्षण संस्था , कॉलेजने सुद्धा या परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

  • महाविद्यालयात  अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घ्या

  • अनेक विद्यार्थी बाहेर राज्यात असताना ते ऑफलाइन परीक्षेसाठी कसे हजर राहतील ? असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे.

  • पदवी अंतिम वर्षाची परीक्षा ऑफलाईन घेतली तर नापास होण्याची सुद्धा भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे

  • शिवाय, पारंपारिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन तर मग व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन का घेत आहे असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.