मुंबई :  राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर  मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हणजे एसआरएअंतर्गत आता मुंबई शहरात कुठेही फक्त अडीच लाखात घर उपलब्ध होणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक झाली. एसआरए प्रकल्पांतर्गातील सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 


या बैठकीत एसआरएबाबत महत्वाचा निर्णय झाला असून, झोपडी निष्कासित झाली की ती तीन वर्षांत विकता येईल. सशुल्क घर विकत घ्यायचं असेल तर तो दर अडीच लाख रुपये ठरला आहे. त्यामुळं गरिबांना अडीच लाख रुपयात घर घेता येणार आहे, असा दावा जीतेंद्र आव्हाड यांनी केला. या निर्णयावर विरोधकांना काय बोलायचंय, त्यावर मला बोलायचं नाही. लाखो झोपडपट्टीधारकांना याचा फायदा होईल", असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.


2011  नंतरच्या पात्र झोपडपड्डीधारकांना अडीच लाख रुपये भरून एसआरए योजनेत घर मिळणार आहे. याआधी 2010 च्या अगोदरच्या झोपडपट्टी धारकांना ही घरं आतापर्यंत मोफत देण्यात येत होती. पण 2011 नंतरच्या पात्र झोपडपट्टी धारकांना सशुल्क घर देण्याची योजना सरकारनं राबवली होती पण याबाबतची आतापर्यंत किंमत निश्चित करण्यात आली नव्हती.   आज या पात्र झोपडपट्टीधारकांना  अडीच लाख रुपये अधिकृत भरून घेणार मिळणार आहे.  याआधी ही किंमत लाखोंच्या घरच जायची तसेच ज्या झोपडपट्टी धारकांची झोपडी पुर्नविकासात गेली आहे.  त्यांना देखील तीन वर्षात झोपडी विकतां येणार आहे.  ज्या दिवशी झोपडी पुर्नविकासात गेली.  त्या दिवसापासून  ते तीन वर्ष होईपर्यतची मर्यादा नियमात धरण्यात येणार आहे.