Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Samajwadi Party leader Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अबू आझमी यांच्या पीएला फोन करुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. तसेच त्यांच्या पीएला या अज्ञात व्यक्तीने (Unknown Person) शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसात (Mumbai Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Deepak Kesarkar On Abu Azmi : मुंबईचे पोलिस सक्षम, अबू आझमींना संरक्षण दिलं जाईल
अबू आझमी (Abu Azmi) हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात (Colaba Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 506 (2) आणि कलम 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, धमकीच्या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे पोलिस (Mumbai Police) सक्षम आहे. त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल. मुंबई सुरक्षीत असल्याचे दिपक केसरकर म्हणाले. या मुंबईमध्ये महिला रस्त्यावरुन फिरु शकतात हे मुंबईचे वैशिष्ट्य आहे. ते आपण जपलं पाहिजे असेही दिपक केसरकर म्हणाले. हे सगळं करत असताना पोलिस प्रशासनाची मदत आम्ही घेतो. रात्रीचे निवारे आम्ही आता तयार करणार आहोत, असेही केसरकर म्हणाले. आमचे मिशन मुंबई असल्याचे केसरकर म्हणाले.
बुधवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. अबूआझमी यांच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. धमकी कुठून आली? यामागे कोण आहे? याची माहिती घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: