Uddhav Thackeray Speech LIVE : लसीकरणासाठी एकरकमी 12 कोटी लसी घेण्याची राज्याची तयारी : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील का? याकडे राज्यातील जनतेंचं लक्ष आहे.
सरकार म्हणून आपण समर्थ आहोत. लसीचे 12 कोटी डोस एकरकमी घेण्यास राज्य सरकार तयार आहे. - मुख्यमंत्री
ऑक्सिजनसाठी तारांबळ उडाली होती, निर्मितीक्षमता 1200 मेट्रिक टन आणि दरदिवशी 1700 मेट्रिक टनची गरज लागली. उद्योगांचा ऑक्सिजन बंद करावा लागला, बाहेरुन मागवावा लागला, अजुनही आणत आहोत : मुख्यमंत्री
आता सुमारे सहाशेच्या आसपास प्रयोगशाळा आपण चालु केलेल्या आहेत. आयसीयु बेड्स, ऑक्सिजन बेड्स वाढवले आहेत. हे सर्व करत असलो तरी एका गोष्टीची आवश्यकता जाणवतेय, ती म्हणजे ऑक्सिजन : मुख्यमंत्री
कडक लॉकडाऊन नाही. परंतु, निर्बंध कायम राहणार. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे : मुख्यमंत्री
परिस्थितीत फरक आहे. परंतु, म्हणावे तितके आकडे खाली आले नाहीत. एक दिलासादायक गोष्ट म्हणजे त्या वेळेस 78 टक्के होते, या वेळेस 92 टक्के आहे. गेल्यावेळेस 2.65 टक्के होते, या वेळेस 1.62 टक्के आहे. रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी गेल्या वेळच्या सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत : मुख्यमंत्री
जनतेवरती निर्बंध लादणे... जी जनता आपल्यावर प्रेम करते, आपल्याला त्यांच्या कुटुंबातील मानते, त्यांच्यावर निर्बंध लादणे यासारखे कटु काम नाही : मुख्यमंत्री
3300 कोटी रु. चा निधी आपण जिल्हाधिकार्यांना मंजुर केला. परंतु, प्रत्यक्षात 3500 कोटी निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे : मुख्यमंत्री
संजय गांधी, श्रावण बाळ, दिव्यांग लाभार्थी योजना या व अशा योजनांतर्गत साडेआठशे कोटी त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत : मुख्यमंत्री
काही ठिकाणी किनारपट्टीवर कायम स्वरुपी योजना करायला हवे, जसे धुप प्रतिबंधक यंत्रणा, वादळात तारा, वीजेचे खांब उन्मळुन पडतात, ती भुमीगत वीजवाहक तारा; पक्की घरे कारण त्यांना नेहमी हलवावे लागते. या व अशा बाबतीत केंद्र सरकारसोबत बोलत आहे. खात्री आहे ते सहकार्य करतील.
कधीही अशी आपत्ती आली, वादळ असो, अतिवृष्टी असो, दुष्काळ असो, यात केंद्र सरकारचे काही निकष, काही परिमाण आहेत. मी तेव्हाही विनंती केली होती, हे निकष आता बदलायला हवे : मुख्यमंत्री
तौक्ते चक्रीवादळात प्रशासनाने चांगलं काम केलं : मुख्यमंत्री
पार्श्वभूमी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील का? लॉकडाऊन उठवण्याची घोषणा करतील का? जिल्हाबंदी उठवतील का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे रात्री 8.30 ला मिळतील.
मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे शिथिलता दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवला तरी तो कशा प्रकारे असेल याची घोषणा मुख्यमंत्री करु शकतील.
व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार?
राज्यातील व्यापारी संघटनेने 1 जूनपासून व्यापार, दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. दुकाने, व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. यामुळेचे येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती.
राज्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले होते. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली होती. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -