= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा, ठाकरे गटाच्या सुनील मोदींची याचिका फेटाळली राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा
कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर, आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली
शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरअध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल केली होती याचिका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल वाल्मिक कराडची अटक खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं आहे तर मग pmla कायदा का लागू केला नाही?? 11 डिसेंबर एफआयआर आहे त्यात वाल्मिक कराडच नाव आहे. आवादा कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. खंडणीची नोटीस असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? एकीकडे तुम्ही नुसत्या आरोपांवर गुन्हा दाखल करता आणि इथ केस आहे तिसरी एफआयआर दाखल केली आहे. मग वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही???, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आदित्य ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, विविध मुद्यांवर चर्चा आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
निवृत्त पोलिसांच्या घरांबाबत चर्चा
सर्वांसाठी पाणी योजनेवर देखील चर्चा
टोरेस घोटाळ्याबाबत चर्चा, आदित्य ठाकरेंची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
EOW चं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात पंचनामा करण्यासाठी दाखल टोरेस घोटाळा प्रकरणी EOW चं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात पंचनामा करण्यासाठी दाखल
दादरच्या टोरेस कार्यालयातील लाॅकरमध्ये ५ ते ६ कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पृथ्वीराज चव्हाणांनी आम आदमी पार्टीत जावं, काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचं मोठं वक्तव्य -पृथ्वीराज चव्हाणांनी आम आदमी पार्टीत जावं, काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचं मोठं वक्तव्य
- आम आदमी पार्टी चांगलं काम करतेय, असं वाटत असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या पक्षात जावं, असं वक्तव्य संदीप दीक्षित यांनी केलं. दिल्लीत आप विजयी होईल, असं चव्हाण म्हणाले होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकायुक्तांच्या दणक्यानंतर सरकारला आली जाग,महिला स्वच्छतागृह उभारण्यासाठी विशेष चौकशी समिती लोकायुक्तांच्या दणक्यानंतर सरकारला आली जाग
महिला स्वच्छतागृह उभारण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी)
राज्यातील महिला खेळाडू व मुंबईतील नोकरदार महिलांचा प्रश्न
नगरविकास विभागाने नेमली एसआयटी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी बैठकीचं सत्र शरद पवार यांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार,खासदार,माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत महिला,युवक आणि विद्यार्थी सेल ची बैठक पार पडली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नरेंद्र मोदी जगभरातील अनिवासी भारतीयांना संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता भुवनेश्वरमध्ये 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे उद्घाटन करणार
नरेंद्र मोदी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत प्रवासी भारतीय संमेलनात असतील
नरेंद्र मोदी जगभरातील अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत
विकसित भारतात अनिवासी भारतीय समुदायाच्या योगदानावर मोदी बोलणार आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजप पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नागपूरमध्ये सदस्यत नोंदणी मोहीम - भाजप पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नागपूरमध्ये सदस्य नोंदणी मोहीम
- महायुतीच्या दोन्ही पक्षांची नागपूर महानगरपालिका निवडणूक तयारी जोरात
- पक्ष बांधणीसाठी राष्ट्रवादीकडून सदस्यता मोहिम
- “राष्ट्रवादीकडून नागपूरातील जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक तयारी”
- राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उमेश झिरपे यांना तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार' जाहीर ज्येष्ठ गिर्यारोहक, गिरिप्रेमी संस्थेचे प्रमुख, जगातील सर्वोच्च अष्ठहजारी शिखर मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांना तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार' जाहीर
साहस विश्वातील सर्वोच्च समजला जाणारा भारत सरकारचा हा पुरस्कार आहे
१७ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार
झिरपे हे गिरिप्रेमी संस्थेचे प्रमुख आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा आपला पाठिंबा, काँग्रेसला धक्का दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा आपला पाठिंबा असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. ठाकरेंच्या सेनेच्या या निर्णयानं काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जातंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दौंडच्या कुरकुंभ हद्दीत मालवाहतूक टेम्पोला अपघात.... पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ हद्दीत मालवाहतूक टेम्पोला अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला जाऊन टेम्पो धडकला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी टेम्पोच मात्र मोठा नुकसान झालं आहे. टेम्पो लटल्यानंतर काही काळ सोलापूर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कामबंद आंदोलन बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. याशिवाय ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत आज हायकोर्टाचा फैसला राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत आज हायकोर्टाचा फैसला येणार आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोष्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये यावरून वाद रंगला होता. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरअध्यक्ष सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा शोध घेण्यासाठी SIT स्थापन मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिक आणि रोहिंगे बेकायदेशीरपणे राहत आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यां अध्यक्षतेखाली विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महापालिका निवडणुकीनिमित्त नागपूर शहर काँग्रेसमध्ये फेरबदलाची शक्यता महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नागपूर शहरात काँग्रेस पक्षाच्या संघटनेत महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात...
प्रत्येक दहा बूथ मागे एक वॉर्ड अध्यक्ष नेमावा असा प्रस्ताव शहर काँग्रेसने पक्ष नेतृत्वासमोर सादर केला आहे...
सध्या नागपुरात 20 ते 25 बूथ मागे काँग्रेसचा एक वॉर्ड अध्यक्ष कार्यरत आहे, मात्र काँग्रेसची गल्लीबोळातील यंत्रणा मजबूत करण्यासाठी आता प्रत्येक दहा बूथ मागे काँग्रेसचा एक वॉर्ड अध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे...
ब्लॉक अध्यक्षांची संख्या ही वाढवण्यात यावी असा प्रस्ताव ही शहर काँग्रेसने पक्ष नेतृत्वाकडे दिल्याची माहिती आहे...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी आंध्र प्रदेश शासनाकडून चौकशीचे आदेश तिरुपती मंदिरात 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैकुंठ दर्शन एकादशीदरम्यान दर्शनाचे स्पेशल टोकन घेण्यासाठी झालेल्या गर्दीत सहा जणांचा बळी गेला … त्याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.