राष्ट्रवादी
अजित पवार
जयंत पाटील
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
नवाब मलिक
राजेश टोपे
अनिल देशमुख
धनंजय मुंडे
जितेंद्र आव्हाड
काँग्रेस
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
विजय वडेट्टीवार
सतेज पाटील
यशोमती ठाकूर
के सी पाडवी
विश्वजित कदम
सुनील केदार
नितीन राऊत किंवा नाना पटोले
वर्षा गायकवाड
शिवसेना
एकनाथ शिंदे
सुभाष देसाई
गोपीकिशन बाजोरिया
सुनील प्रभू
अनिल परब
उदय सामंत
दीपक केसरकर
तानाजी सावंत
गुलाबराव पाटील
संजय राठोड
आशिष जायस्वाल
इतर पक्ष
राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
बच्चू कडू (प्रहार)
महाविकासआघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्या 28 तारखेला उद्धव ठाकरे हे सायंकाळी 6.40 मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सर्व आमदारांना शपथ विधानसभेत देण्यात आली. यावेळी विधानभवनात येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन करुन त्यानंतर राजीनामा देऊन परत आलेल्या अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांनी गळाभेट घेत स्वागत केले.
अब की बार... ठाकरे सरकार! शपथविधी सोहळा कसा असणार?
दरम्यान, मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क येथे गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. ठाकरे कुटुंबातील उद्धव हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पहिले सदस्य आहेत.