मुंबई : गिरणी कामगारांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. कारण राज्य सरकारनं गिरणी कामगारांसाठी घरं उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 हजार 52 घरांसाठी लवकर लॉटरी जाहीर केली जाणार आहे.


 

बंद गिरण्यांच्या जागेवर तब्बल 2 हजार 634 घरं तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत 2 हजार 418 अशी एकूण 5 हजार 52 घरं गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. ही घरं 225 चौरसफूटांची असून या घरांसाठी लवकर सोडत काढण्यात येणार आहे.

 

बंद गिरणींच्या जागेवर बांधलेल्या घरांची किंमत साडे नऊ लाख रुपये असणार आहे. तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत उपलब्ध होणाऱ्या घरांची किंमत 6 लाख रुपये निश्चित केली आहे. त्यामुळं आता गिरणी कामगारांच्या लढ्याला मोठं यश मिळालंय असं म्हणावं लागेल.