मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग दिसून आली नाही. तिकीट खिडक्यांवर देखील सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत. 

राज्य सरकारने स्थानकात कोणाला प्रवेश घ्यावा आणि कोणाला देऊ नये या संदर्भातल्या लेखी आदेश रेल्वेला दिले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीला देखील बोलावले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात घेणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. तिकीट खिडक्यांवर देखील घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात आहे. 

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात गर्दीचे निरीक्षण करुन मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की तशाच ठेवायच्या याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

राज्यात 15 दिवस संचारबंदीराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. 

काय सुरु राहणार?- राज्यात 144 कलम चालू, पुढचे 15 दिवस संचारबंदी.- अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.- घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये. - आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. - सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.- लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.- जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.- पावसाळी पूर्व कामं सर्व सुरु राहतील.- अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहिल.- हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील टेक अवे सुरुच राहतील.- रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.

काय बंद राहणार? - प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत बंद - रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही. - अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद - कामाशिवाय फिरण्यास बंदी - सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद - धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी