मुंबई: हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही अकार्यक्षमंत्र्यांना नारळ दिला जाण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


राज्य सरकारला येत्या 31 ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सविस्तर मुलाखत दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली.

मंत्रिमंडळ विस्तारात  स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापन करुन एनडीएत डेरेदाखल झालेल्या नारायण राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा

गेली अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. आधी श्रीकृष्ण जन्माष्टमी, मग गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे अनेक मुहूर्त येऊन गेले, मात्र फडणवीस सरकारचा विस्तार झाला नाही.

यानंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज होता. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराला 2 महिने होत आले, तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

अकार्यक्षम नेते-मंत्र्यांना डच्चू?

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपीमिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. तर एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे.

या दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली होती.

याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही छाप उमटवणारं काम केलेलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत.



संबंधित बातम्या

भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर 

देसाई-मेहतांचं राजीनामानाट्य, मुख्यमंत्र्यांनी राजीनामे फेटाळले

तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवे पुन्हा बरळले! 

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता 

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे