मुंबई : सरकारने वीजबिल माफ न केल्यास येत्या 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्कार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माध्यम विभाग प्रभारी माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक है उपस्थित होते.


बावनकुळे यानी केलेल्या मागण्या




  1. 100 युनिटपर्यंत वीज मोफत द्या विधिमंडळाच्या मागील वर्षी झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे जाहीर केले होते. मात्र, या घोषणेची अजून अंमलबजावणी झालेली नाही. हा निर्णय घेतल्यास राज्यातील 1 कोटी 40 लाखांहून अधिक सर्वसामान्य वीज ग्राहकांना त्याचा फायदा मिळेल. यासाठी राज्य सरकारने 5 हजार 800 कोटीची तरतूद करावी.

  2. अवाजवी बिले दुरुस्त करून द्या : लॉकडाऊन काळात अनेक उद्योजक, छोटे व्यावसायिक व्यापारी यांना पाठवण्यात आलेली अवाजवीबिलाची दुरुस्ती करून द्यावी.


वीजबिल माफीचं काय? 'राज्याचे पैसे केंद्रानं अडवले!', आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने

  1. 100 ते 300 युनीट इतका वीज वापर असणाऱ्या 51 लाख वीज ग्राहकाना बिल माफीसाठी राज्य सरकारने महावितरणला 5 हजार कोटी रुपये द्यावेत.

  2. विद्युत शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारकडे दरवर्षी 9 हजार 500 कोटी रूपये एवढा महसूल जमा होतो. हा महसूल वीज बिल माफीसाठी उपयोगात आणावा तसेच उर्वरीत रकमेसाठी राज्य सरकारने अर्थसकल्पात तरतूद करावी.

  3. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात थकबाकी वसूलीसाठी 45 लाख कृषी ग्राहकापैकी एकाही शेतकऱ्याचा वीज पुरवठा तोडला गेला नाही. आघाडी सरकारला हे का जमू नये?

  4. या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.