मुंबई: मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल झाले होते, त्याच पद्धतीचे गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा, अशी मागणी भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.


याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता, पण त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली. तसाच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे. त्यांचं कृत्यही दहशतवादाप्रमाणेच आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

याशिवाय भीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला, ते मुख्यमंत्र्यांना माहित आहे, असं दावा त्यांनी केला.

लोकांनी त्यांचे त्यांचे धर्म पाळावे, तुम्ही सांगाल तो धर्म असं चालणार नाही. राज्याला धर्म असू नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

आजच्या बंदमध्ये इच्छेने सहभागी व्हा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आंदोलकांनी संयम ठेवा, जबरदस्ती नको, शांततेने बंद पाळला जावा, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं.

दलित न्यायाधीश नको

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचं स्वागत आहे. पण या चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी दलित न्यायाधीश नको. त्यामुळे सवर्णांवर अन्यायाची भावना होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या

LIVE : महाराष्ट्र बंद : लोकसभेत निवेदन होण्याची शक्यता 

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजप आणि संघाचा हात : मायावती 

LIVE- महाराष्ट्र बंद, शासकीय सुट्टी नाही 

पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार