Maharashtra Assembly Session : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधीमंडळ अधिवेशनाला पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकार सामोरे जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला. शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना 'आले रे आले, गद्दार आले' अशी घोषणाबाजी केली. 

Continues below advertisement

विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर विरोधक आक्रमक दिसले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांबाबत विरोधकांनी घोषणाबाजी केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून ही घोषणाबाजी सुरू होती. या दरम्यानच, शिंदे गटाचे आमदार विधानभवनात एकाच वेळी जात होते. त्यांना पाहून विरोधकांनी 'आले रे आले, गद्दार आले' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. 

पाहा व्हिडिओ: शिंदे गटाच्या आमदारांची एन्ट्री, विरोधकांची घोषणा, आले रे आले गद्दार आले!

Continues below advertisement

 

'हे गद्दार सरकार, कोसळणार म्हणजे कोसळणारच'

आदित्य ठाकरे हेदेखील विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी म्हटले की, "आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी केला. 

आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपावरही टीका केली. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. काहींना आधीच्या तुलनेत कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. जे त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालेलं नाही. म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, एका पक्षासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना तिथे जाऊन काहीच मिळालेलं नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून घमासान 

गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो  कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसणार आहे.