मुंबई : सोशल मीडियावर सध्या राज्यात विरोधात असलेले भाजप नेते आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार असल्याची टीका केलीय. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवे यांना त्याच शैलीत प्रत्त्युत्तर दिलं आहे.


शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे राज्यातले महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. मात्र, तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार, प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची विचारला आहे. या संदर्भात दानवे यांनी ट्वीट केलं आहे.




काय आहे ट्वीट?
महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते ऐकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल:


गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर
मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनीचे असल्याचे म्हटले आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!


गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्वीट




आम्ही सरकार पाडणार नाही : भाजप


गेल्या काही दिवसांपासून भाजप राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोप होत आहे. मात्र, हे आरोप भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. आघाडी सरकार आम्हाला पाडण्याची आवश्यकता नाही. ते त्यांच्या कर्मानेचं पडणार असल्याचे भाजप नेत्यांनी दावा केला आहे. सध्या राज्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थिती हाताळण्यात आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. तर मोदी सरकारने मंदूर केलेल्या कृषी कायदा आणि कामदार कायदा या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे.


केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारं वक्तव्य