मुंबई : जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि कवी विलियम शेक्सपियरने म्हटलं होतं. नावात काय आहे? परंतु नावातच सगळं काही असतं, ही बाब अधोरेखित करणारी काही आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील नावात बदल करणाऱ्या नागरिकांनी राज्याच्या तिजोरीत 5 कोटी रुपयांची भर टाकली आहे.
मुंबईसह राज्यातील नाव बदलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्य सरकारकडून नावात बदल करणाऱ्यांकडून 523 रुपये शुल्क आकारले जाते. नावात बदल करणाऱ्यांची संख्या इतकी आहे की, या लोकांकडून शुल्काच्या रुपात आतापर्यंत 5 कोटी रुपये आकारले आहेत.
एप्रिल 2018 ते जून 2019 पर्यंत महाराष्ट्रात तब्बल 1 लाख लोकांनी त्यांच्या नावात बदल केला आहे, अथवा नाव बदललं आहे. नावात बदल करण्यामागची विविध कारणे लोकांनी दिली आहेत. त्यामध्ये लग्नानंतर पतीचं आडनाव लावणे, घटस्फोट झाल्यानंतर नाव बदलणे, धर्म परिवर्तन करणे, पुनर्विवाह करणे, दत्तक घेणे, सरकारी ओळखपत्रांवरी नावातील स्पेलिंग बदलणे, नशीब बदलण्यासाठी ज्योतिषांनी सुचवलेले बदल करणे अशा अनेक कारणांमुळे अनेक लोक त्यांचं नाव बदलतात किंवा नावात काही बदल करतात.
नावात बदल करण्याची पूर्वीची प्रक्रिया खूपच अवघड आणि खूप जास्त वेळ घेणारी आहे. परंतु 2014 साली सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन केली. नव्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आतापर्यंत राज्यात 6 लाख लोकांनी नावात बदल केले आहेत. पूर्वी नावात बदल करण्यासाठी 125 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता याच कामासाठी 523 रुपये आकारले जातात. मागसवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोकांकडून याच कामासाठी 270 रुपये आकारले जातात. नावात बदल करुन लोकांच्या नशीबात बदल होवो न होवो, परंतु राज्याच्या तिजोरीत मात्र भर पडत आहे.
नाव बदलणाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या तिजोरीत 5 कोटींची भर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2019 06:23 PM (IST)
जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि कवी विलियम शेक्सपियरने म्हटलं होतं. नावात काय आहे? परंतु नावातच सगळं काही असतं, ही बाब अधोरेखित करणारी काही आकडेवारी समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -