मुंबई : सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे. वडाळा विधानसभा मतदार संघात आज भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. माझे ठरले आहे की, मी पेस बॉलिंग करणार मी गुगली पण टाकणार आहे. आणि जेंव्हा बॅटिंग का येईल ती ही चांगली करेन. मी योग्य बॉल टाकतो. मी शॉटपिच बॉलिंग करतो. त्याने समोरच्यांना खेळायला अडचण होत आहे. 




यूपीएचे कॅप्टन बदलण्याच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं.  
 
यावेळ ते म्हणाले की, चौकशी कुणाची करायची असतें ज्यांनी चोरी केली त्यांची की ज्यांनी ती सापडून देणाऱ्याची. ज्यांनी चोरी केली त्यांना मोकाट सोडू आणि ज्यांनी पकडून दिली त्यांची चौकशी करु हा या सरकारचा न्याय आहे. जे रॅकेट तयार झालंय त्यांच्यावर कारवाई करण्याची मानसिकता नाही, रॅकेट बाहेर काढणाऱ्यावर कारवाई केली जातेय. 


फडणवीस म्हणाले की, हे सरकार रश्मी शुक्ला यांच्या विरोधात चौकशी करणार आहे. खरंतर हा प्रश्न आहे की ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं त्यांची चौकशी केली जाते पण ज्यांनी हे सगळं प्रकरण केलं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ते अजून मोकाट फिरत आहेत. त्यामुळे एका महिला अधिकाऱ्यांच्या संदर्भात या सरकारची भूमिका नक्की नेमकी काय आहे, हे समजून येत आहे. ज्या मंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात हे वक्तव्य केलं आहे, त्यांनी विचार करायला हवा की आपण एका महिलेबद्दल काय बोलत आहोत, या संदर्भात बोलताना त्यांना भान सुद्धा नाही.