मुंबई : एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत झपाट्याने वाढत आहे, दुसरीकडे गेल्या दोन महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने राज्याची तिजोरी रिकामी होत आहे. तर, सर्वसामान्यांच्या हातचे काम गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशात राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी 'मिशन बिगीन अगेन' म्हणत सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज (8 जून) तिसऱ्या फेझला सुरुवात होणार आहे. यामध्ये अनेक शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.


मिशन बिगीन अगेन - फेझ 3


काय काय सुरु होणार?




  • 10 टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालयं, राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी बेस्ट सुविधा सुरु होणार आहे.

  • मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत.

  • अत्यावश्यक सुविधांसोबतच इतर सुविधांची दुकाने यापूर्वीच सुरु करण्यात आली आहेत.

  • विशेषत: दादरसारख्या शॉपिंग हब असणाऱ्या ठिकाणी विशेष काळजी घेऊन नानासिंह क्रांती पाटील मनपा मंडई आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे फुलमार्केट सुरु केले जाणार आहे.

  • मंडई सुरु करण्यापूर्वी तिथल्या व्यापारी समित्यांना महापालिकेने सूचना दिल्या आहेत. तसेच, मंडई सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी करण्यात आल्या आहेत.


Corona Update | राज्यात आज 3007 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आज 1924 रुग्ण कोरोनामुक्त


आजपासून सुरु होणाऱ्या मंडईसाठीचे नियम




  • मंडईतील मर्यादीत प्रवेशद्वारं खुली ठेवण्यात येतील. दादरच्या क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील 10 पैकी 4 प्रवेशद्वारं खुले असतील.(सुरुवातीचे 10 दिवस दादरमधील मंडईची वेळ पहाटे 5 ते 11 असेल शिस्त पाळल्यास वेळ पहाटे 5 ते दुपारी 1 करण्यात येईल)

  • मंडईतील व्यापारी आणि गाळाधारकांना भाज्यांच्या गाड्या एकाच वेळी आणता येणार नाही. एकाच वेळी भाज्यांच्या गाड्या आल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी संघाने गाड्यांचे नियमन करणे आवश्यक राहिल.

  • एका दिवशी एकाच बाजूचे गाळे सुरु ठेवता येतील, एकदिवसाआड दुकाने सुरु ठेवण्याची पद्धत अवलंबली जाणार आहे. (कोणत्या दिवशी कोणती दुकाने सुरु ठेवायची हे व्यापारी संघ ठरवतील)

  • एका वेळी दोन पेक्षा जास्त ग्राहक गाळ्यांभोवती असणार नाहीत.

  • मंडईत सामाजिक अंतर पाळणं आवश्यक आहे. यासाठी व्यापारी समित्यांकडून काही स्वयंसेवक नेमले जातील. मास्कशिवाय मंडईत प्रवेश मिळणार नाही. मंडईच्या बाहेर सॅनिटायझर ठेवण्यात येईल. थर्मल गनने शारीरिक तापमान तपासले जाईल.


Sonu Sood | सोनूकडे मदतीचे आर्जव केलेले बहुतांश ट्वीट डिलीट