मुंबई : राज्यात आज 1924 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 39 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 3007 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 85 हजार 975 इतका झाला आहे. पैकी सध्या 43 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 64 पुरुष तर 27 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 91 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 46 रुग्ण आहेत तर 41 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 91 रुग्णांपैकी 67 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आज झालेल्या मृत्यूपैकी 31 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 13 मे ते 4 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 60 मृत्यूपैकी मुंबई 44, उल्हासनगर 5, मीरा भाईंदर 4, सोलापूर 4, नाशिक 1, पालघर 1 आणि इतर राज्य 1 असे मृत्यू आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 51 हजार 647 नमुन्यांपैकी 85,975 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 463 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 28 हजार 504 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
Corona Ground Report | महाराष्ट्राच्या गावागावातून कोरोना परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट