मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आता 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामळेच 31 मे पर्यंत राज्यातील कडक निर्बंध कायम ठेवणार असल्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतोय, त्यामुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवलं जाऊ शकतं.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, सरकारचा निर्णय
लॉकडाऊनचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात येईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती दिली आहे. लॉकडाऊनचा चांगला परिणाम राज्यात आणि मुंबईवर झाला आहे. लॉकडाऊन करायचा नसेल तर कशा प्रकारे लॉकडाऊननध्ये रिलॅक्सेशन द्यायचं यावर विचार होईल. टास्क फोर्स आणि महाविकास आघाडी मिळून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असं अस्लम शेख यांनी दिली.
रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही- हायकोर्ट
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं.
कोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही परवड, केवळ 27 टक्के कुटुंबांनाच 50 लाखांच्या विमा योजनेचा लाभ
दिलासादायक! राज्यात आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,69,425 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरेहोण्याचेप्रमाण (Recovery Rate) 86.97 टक्के झाले आहे. आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.