Mumbai Local Megablock on 2 July, Sunday : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज, रविवारी लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. आधी लोकल प्रवासाचं नियोजन करा आणि नंतरच घराबाहेर पडा. आज 2 जुलै रोजी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गावर अप आणि डाउन धीम्या मार्गांवर रविवारी सकाळी 10:35 ते 3:35 या वेळेत पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक


माटुंगा मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावरून


सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.15 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबणाऱ्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेहून 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबवून अप जलद मार्गावर माटुंगा स्थानकावर वळवण्यात येतील आणि ते स्थानकावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


हार्बर लाइन


पनवेल - वाशी अप आणि डाउन लाईन सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत


सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेलहून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत रद्द राहील.


ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.


ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी या मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत.


पश्चिम रेल्वे


चर्चगेट - मुंबई सेंट्रल अप आणि डाउन स्लो लाईन्स सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत


ट्रान्स हार्बर लाइनवर मेगाब्लॉक नाही