Local Megablock on 2 July, Sunday : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास (Local Train) करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी, 2 जुलै रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway Megablock Today) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास करण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा.


मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक


माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित आगमनापेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
 
ठाणे (Thane) येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित आगमनापेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
 
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आबे (बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून)
 
पनवेल (Panvel) येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
पनवेल (Panvel) येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील.
 
ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
 
ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.