ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलला आग, एक डबा खाक
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2018 08:31 AM (IST)
आगीच्या वेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोकलचे मोठे नुकसान झाले.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात आगीची घटना घडली. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरुन स्लाईडिंगला जाणाऱ्या लोकलच्या 2010-बी या कोचला आग लागली. 4 फायर इंजिन, 2 पाण्याचे बंब यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. बचावकार्य करणाऱ्या पथकाचे वाहनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. आगीत लोकलचा एक डबा जळून खाक झाला. आगीच्या वेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोकलचे मोठे नुकसान झाले.