मुंबई: वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या विरोधात कामाठीपुऱ्यातील स्थानिक लोकांनी रस्ता रोको केला. यावेळी कामाठीपुऱ्यातील स्थानिक नागरिक आणि महिलांमध्ये झालेल्या वादाला हिंसक रुप लागलं. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

स्थानिक लोकांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या वागणुकीवरुन आक्षेप आहे. याप्रकरणी पोलिसांत अनेकदा तक्रार करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, काहीच उपयोग न झाल्यानं स्थानिकांनी त्यांनी रास्तारोको करुन आपली नाराजी व्यक्त केली.

 

या महिलांवर कारवाई करण्यात यावी यासाठी येथील स्थानिकांनी रात्री उशीरापर्यंत रास्ता रोको केला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार? याकडेच आता स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.