मुंबई : आतापर्यंत मुंबईच्या वेशीबाहेर असलेले भारनियमन उपनगरात डोकावत आहे. पुढचे पाच दिवस मुंबईच्या उपनगरांतील रहिवाशांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे.


 
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा विद्युत केंद्राचा टॉवर मंगळवारी कोसळल्यामुळे मंगळवार आणि बुधवारी काही भागात टप्प्या टप्प्याने भारनियमन करण्यात आलं होतं. या टॉवरच्या दुरुस्तीचं काम पुढचे पाच दिवस सुरु राहणार असल्यामुळे काही भागात लोडशेडिंग करण्यात येईल.

 
कुठे कुठे लोडशेडिंग?

 
विक्रोळी, अंधेरी-वर्सोवा, साकीनाका, बोरिवली, मालाड, कुर्ला या भागात भारनियमन करण्यात येणार आहे. याचा फटका या भागातील शाळा, रुग्णालयांना बसण्याची दाट शक्यता आहे.

 
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु झाले असून, जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत मुंबईकरांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार असल्याचं दिसतंय.