अंबरनाथ : सर्वसामान्य मुंबईकरांचं खाद्य अशी ओळख असलेल्या वडापावमध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. या प्रकारानंतर वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी करण्यात आली आहे.
अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता असून त्याच्या दुकानात हा प्रकार समोर आला आहे. याच भागातल्या एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने आज सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेले. मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली.
त्यानंतर, गोहिल यांनी पुन्हा दुकानात धाव घेतली असता त्यांना कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं देत अक्षरशः हाकलून दिलं. त्यामुळं ग्राहकांनी तिथे गोंधळ घातला. यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, तिथे बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं.
धक्कादायक बाब म्हणजे, दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी हा पाल असलेला वडा फेकून दिला असून त्यात पाल होती, अशी कबुलीही दिली आहे. या सगळ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत दुकान बंद केलं. या दुकानावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
वडापावमध्ये पालीचं मेलेलं पिल्लू आढळलं, अंबरनाथमधील प्रकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2018 03:51 PM (IST)
अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, तिथे बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं.

फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -