मुंबई : अंधेरी एमआयडीसीमधील धनलक्ष्मी अपार्टमेन्टमध्ये दुहेरी आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे. 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या स्वाती गोहिल आणि विवेक गुप्ता या दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

 

शेजाऱ्यांना वास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅट उघडून मृतदेह ताब्यात घेतले. तीन ते चार दिवसांआधी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

 

या दोघांचं 'लिव्ह इन'मध्ये राहणं त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. लग्नास परवानगी मिळत नसल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.

 

घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ज्यावरून प्रेमभंगातून आत्महत्या झाल्याचा अंदाज आहे. मयत तरूणी ही वॉक्हार्ट रुग्णालयात जॉबला होती. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.