Lilavati Hospital मुंबई: लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital Mumbai) गेल्या 20 वर्षांत 1250 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रस्टने 17 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सात माजी विश्वस्त, उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी बहुतांश जण दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असलेले अनिवासी भारतीय आहेत.

लीलावती रुग्णालयातील 1250 कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण तापले असताना आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. किशोर मेहतांच्या आजारपणात भाऊ विजय मेहतांकडून खोट्या सह्या करुन ट्रस्ट ताब्यात घेण्यात आली. 2002-03 ते 2023 पर्यंत लीलावती हॉस्पिटल विजय मेहतांच्या ताब्यात होते. 2023 साली लीलावती  हॉस्पिटल पुन्हा प्रशांत मेहतांना देण्याचे धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिले. बांद्रा पोलिसांकडून सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडं हस्तांतरीत करण्यात आला आहे.

केबिनच्या फरशीखाली मिळाले मानवी हाडे, केस व जादूटोण्याचे अन्य सामान-

विजय मेहता व ट्रस्टींनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये काळी जादू केल्याचंही समोर आलं आहे. रुग्णालयातील केबिनच्या फरशीखाली 8 कलश मिळाले. या 8 कलशांत मिळाले मानवी हाडे,केस व जादुटोण्याचे अन्य सामान आढळून आले. ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. त्याआधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केले असता तेथे मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस आढळून आले. 

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याची बाब समोर-

सदर प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै 2024 मध्ये 12 कोटींची फसवणूक झाल्याबाबत एफआयआर दाखल केली. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये 44 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी एफआयआर 1250 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याबाबत एफआयआर दाखल केल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी सांगितले. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याची बाब समोर आली. खरेदी विभाग असतानाही विजय मेहता व ट्रस्टींची अन्य कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली. 

संबंधित बातमी:

Mumbai Accident: होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडलं; एकाचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

Holi In Mumbai: मुंबईत होळी-धुलीवंदनाच्या दिवशी डीजे-लाऊडस्पीकरला बंदी; आदित्य ठाकरे संतापले, महायुतीला घेरले!