मुंबई : बिल्डर प्रदीप जैन हत्याकांडप्रकरणी दोषी रियाज सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने आज हा निकाल दिला आहे.
1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी रियाज सिद्दीकीला टाडा कोर्टाने आधीच दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. आज त्याला बिल्डर प्रदीप जैन हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
7 मार्च 1995 रोजी जुहूतील बंगल्याबाहेर बिल्डर प्रदीप जैन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 1 सप्टेंबर 2017 रोजी टाडा कोर्टाचे न्यायाधीश गोविंद सानप यांनी रियाज सिद्दीकीला प्रदीप जैन यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपात दोषी ठरवलं होतं.
विशेष म्हणजे याआधी रियाजला या खटल्यात सरकारी साक्षीदार बनवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याने आपली साक्ष पलटली. त्यामुळे त्याला आरोपी बनवून पुन्हा खटला सुरु झाला, ज्यात दोषी सिद्ध झाला.
या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मेहंदी हसन शेख आणि वीरेंद्र कुमार झांब यांना आधीच जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.
प्रदीप जैन हत्याकांड : दोषी रियाज सिद्दीकीला जन्मठेप
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
12 Sep 2017 02:23 PM (IST)
1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी रियाज सिद्दीकीला टाडा कोर्टाने आधीच दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. आज त्याला बिल्डर प्रदीप जैन हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -