उल्हासनगरमधील इमारतीत बिबट्या घुसला!
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2018 12:47 PM (IST)
वनविभागाला पाचारण करण्यात आले आहे. मात्र अद्याप वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत.
ठाणे : उल्हासनगरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. उल्हासनगरमधील सेक्शन-5 येथील भाटिया चौकातल्या एका इमारतीत बिबट्या घुसला. वनविभागाला पाचारण करण्यात आले आहे. मात्र अद्याप वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, बिबट्याची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.