Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मधुर भांडारकर, आशा भोसले, आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे, श्नद्धा कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तर उद्या सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लता मंगेशकरांची भेट घेणार आहेत. 


कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे. 


लता दींदींच्या प्रकृती संदर्भात माहिती देत आशा भोसले म्हणाल्या,"लता दीदींची तब्येत बरी आहे. दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दीदींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी आम्हीदेखील प्रार्थना करत आहोत". 


92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते. 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता दीदींना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती


Lata Mangeshkar Critical : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, राज ठाकरे भेटीसाठी रुग्णालयात दाखल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha