Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा धुमाकूळ माजवण्यास सुरुवात केली असताना मागील काही दिवसांत रुग्णांसंख्येचा स्फोट होत होता. पण सोमवारी रुग्णसंख्येत कमतरता आल्यानंतर आजही 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित सापडल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मिळाला आहे. नुकत्याच पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित समोर आले असून दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

  

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल 14  हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 413 झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते ज्यानंतर मागील 2 ते 3 दिवसांत ही रुग्णसंख्या काहीशई स्थिरावली असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठीच मागील काही दिवसांतील आकडेवारीवर एक नजर...

मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी -

तारीख मुंबईतील रुग्णसंख्या
24 डिसेंबर 683
25 डिसेंबर 757
26 डिसेंबर 922
27 डिसेंबर 809
28 डिसेंबर 1377
29 डिसेंबर 2510 
30 डिसेंबर 3671
1 जानेवारी 6347
2 जानेवारी 8063
3 जानेवारी 8082
4 जानेवारी 10860
5 जानेवारी 15166
6 जानेवारी 20181
7 जानेवारी 20971
8 जानेवारी 20,318
9 जानेवारी 19474
10 जानेवारी 13,648
11 जानेवारी 11,647

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha