Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईत (Mumbai) आमरण उपोषण करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी त्यांच्याकडून पायी दिंडी देखील काढण्यात आली आहे. दरम्यान, यावर बोलतांना मंत्री दीपिक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठं वक्तव्य केले आहेत. मनोज जरांगेंची मूळची भूमिका मान्य झाली असून, जरांगे यांनी यावर योग्य विचार करावा असे केसरकर म्हणाले आहेत.
दरम्यान यावर बोलतांना केसरकर म्हणाले की, "मनोज जरांगे यांची मूळची भूमिका मान्य झाली आहे. कुणबी दाखले मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते, पण आता कुणबी दाखले मिळत आहेत. महाराष्ट्रातले सर्वच प्रमाणपत्र तपासले गेलेत. सर्वांना अर्ज करावा लागतो, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं. याचं श्रेय देखील जरांगे यांनाच मिळते. टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे मूळ मागणी मान्य झाली असून, जरांगे यांनी योग्य विचार करावा असे केसरकर म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांनी धीर धरावा...
मनोज जरांगे यांनी संयम ठेवावं, त्यांची पहिली मागणी मान्य झाली असून, आता दुसऱ्या मागणीसाठी धीर धरावा. जात जन्मामुळे लागते, रक्त नात्याची मागणी मान्य केलेली आहे. जरांगे समजूतदार नेते आहेत. त्यांनी सरकारला मुदत द्यावी, सगळ्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सर्व्हेसंदर्भात काही त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे टिकणारे आरक्षण करण्याचा देखील प्रयत्न आम्ही करतोय, असे केसरकर म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे मातोरी गावातून मुंबईकडे निघाले आहेत. आज ते अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तसेच, त्यांचा मुक्काम देखील अहमदनगर जिल्ह्यातच असणार आहे. तर, 26 जानेवारीला मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये नेत्यांची उपस्थिती
मुंबई मॅरेथॉनमध्ये आज अनेक महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी ड्रीम रनमध्ये यंदा 26 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. तसेच, अनेकांकडून विविध सामाजिक संदेश देत वेगवेगळ्या आजारांसंदर्भात जनजागृती देखील करण्यात आली. अशातच, उद्याला पार पडणाऱ्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठेसंदर्भात देखील संदेश देण्याचा प्रयत्न यंदाच्या मॅरेथॉनमध्ये होतांना पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा; जरांगेंचा सरकारला इशारा