मुंबई : गणेशोत्सवाच्या पहिल्या चार दिवसांतच 'लालबागच्या राजा'च्या चरणी कोट्यवधी रुपयांचं दान जमा झालं आहे. भाविकांनी बाप्पाला 90 लाख रुपयाचं सोनं आणि 3 कोटी 20 लाख रुपयांची रोकड अर्पण केलं आहे.


 
3.2 किलो सोनं (अंदाजे किंमत 90 लाख रुपये) आणि 40 किलो चांदीची (अंदाजे किंमत 18.4 लाख रुपये) मोजदाद करण्यात आली आहे. याशिवाय 3.2 कोटी रुपये जमा झाल्याचं मंडळ कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

 
बाप्पाच्या चरणी जमा झालेल्या राशीची मोजदाद गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून केली जात आहे. यासाठी खास बँक ऑफ महाराष्ट्रतील कर्मचारी नेमले गेले आहेत. गणेशोत्सवानंतर बाप्पाच्या चरणी जमा झालेल्या अलंकारांचा रितसर लिलाव करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी लिलावातून 90 लाख रुपये जमा झाले होते.